Home > Latest News > ‘शिवार संसद: एक युवा चळवळ रोखतेय शेतकऱ्यांच्या आत्महत्या – दिव्य मराठी

कोल्हापूर- ‘शिवार संसद’- एक युवा चळवळ नावाची संस्था कोल्हापूर जिल्ह्यात जन्माला आली आहे आणि ही शिवार संसद गेल्या दीड दोन-वर्षांत राज्यभरात पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी जाऊन शेतकऱयांच्या प्रश्नांना वाचा फोडून, शेतकऱयांचे प्रबोधन करून तेथील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकांची मोठी फौज तयार करत आहे.

एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल 300 गावात जावून या संस्थेच्या युवकांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देत दिलासा देण्याचे मोठे काम करून बोलघेवड्या शासनाला चपराक देणारे कार्य करून दाखवले आहे.

कोल्हापूरातील विनायक हेगाणा या बी.एस्सी. अॅग्रीकल्चर झालेल्या विद्यार्थ्याने सुरू केलेली ही चळवळ आता चांगलंच बाळसं धरू लागली आहे. शेतकऱयांच्या जीवाशी एकरूप होऊ लागली आहे. २०१२ साली कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विनायकने आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करू लागला. यूपीएससीचा अभ्यास करून मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारा विनायक एके दिवशी कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य सुनीलकुमार लव्हटे यांना भेटला. त्यांच्याशी चर्चा करत असतानाच प्राचार्य लव्हटे यांनी विनायकला राज्याला भेडसावणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी उपक्रम राबवण्याचा सल्ला दिला.

Your email address will not be published. Required fields are marked *

*