Home > Latest News > आपल्या मायबापासाठी मदत करा – अभिनेता भारत गणेशपुरे

नट म्हणून आम्ही जसे गावागावांत जाऊन लोकांचे मनोरंजन करतो. तसेच या हेल्पलाईनसाठी लोकांनी मदत करावी यासाठी “मदत झोळी’ फिरविणार आहोत. दहा रुपयापासून शक्‍य असेल तितक्‍या प्रमाणात लोकांनी मदत करावी. प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला जाणार आहे. – भारत गणेशपुरे, अभिनेता.

औरंगाबादशेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी लवकरच शिवार संसद चळवळीतर्फे राज्यभरात हेल्पलाईन सुरु होणार आहे. चळवळीचे यश पाहता यंदा नऊ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखले असून चळवळीला बळकटी देण्यासाठी आपल्या मायबापासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन अभिनेता भारत गणेशपुरे यांनी शनिवारी (ता. 22) औरंगाबादेत केले.

औरंगाबाद येथे संवाद साधताना अभिनेता गणेशपुरे म्हणाले की कोल्हापूर येथील तरुण विनायक हेगाणा याने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यसाठी शिवार संसद चळवळीच्या माध्यमातून कार्य हाती घेतले असून कार्य हाती घेतले आहे. गावागावात सध्या एकटेपण वाढले आहे, त्यातून बॅंकांचे कर्ज, शेतमालाला अपेक्षित भाव न मिळणे, शेतीतील अडचणी यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. मात्र या हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न असून आपल्यासाठी कोणीतही आहे ही भावना त्यांच्यात निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

 अशी असेल हेल्पलाईन 

बऱ्याच संस्थांकडून शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते आदि निविष्टा पुरविल्या जातात. याची माहिती शेतकऱ्यांना होत नाही, त्यांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी हक्काच व्यासपीठ म्हणून ही हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक, आर्थिक प्रश्‍नांवर मात करण्यासाठी घरगुती प्रश्‍नही सोडविण्याचा प्रयत्त्न केला जाणार आहे.

मदतीचे आवाहन 

याकामी मदत करण्यासाठी जबाबदार म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींबरोबरच कंपन्यांनी सीएसआर फंडाद्वारे मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात 55 तरुणांनी मोबाईल नंबरद्वारे हेल्पलाईन सुरु केली असून ही चळवळ आता व्यापक स्वरुप धारण करत आहे. यातून शेतकऱ्यांना पैसेरुपी मदत होणार नसून हे पैसे थेट शेतकऱ्यांना न देता त्याची समस्या सोडविण्यासाठी या पैशाची मदत होणार आहे. खत पाहिजे असेल तर त्यासाटठी पैसे न देता त्यातून खत खरेदी करुन दिले जाणार आहे. भरभरुन मदत करा, यातून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत. मदत करण्यासाठी आयडीबीआयच्या बॅंक शाखा कोल्हापूर च्या खाते क्रमांक 0615104000181396, IFSC:IBKL0000615 शिवार फाऊंडेशन नावे खात्यातही जमा करु शकणार आहात. www.shivarsansad.com 8275257996 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

*